# चला थोडं वेडं होऊया.....
चला थोडं वेडं होऊया...
वय, वजन,उंची...
जातपात,स्त्री पुरुष...
उच्चनीच, श्रेष्ठ कनिष्ठ..
भेद सारेच विसरनी..
बेधुंद होऊन जगूया...
थोडंस खट्याळ होऊन..
आपणंच आपल्या मनाला
मस्त भुलवूया....
चला थोडं वेडं होऊया........
काय माहित.....
कधी एक्झीट होईल...
क्षणात सारं संपून जाईल...
तुझं,माझं, अरे!साऱ्यांच़च...
इथंच राहून जाईल....
मग काय?....
बोलाचीच कढी अन् बोलाचाचं भात होईल...
म्हणूनच....
चला थोडं वेडं होऊया.....
कर्तव्याच्या धांदलीत....
खूप काही हातातून सुटलं असेल...
मित्र,मैत्रिणी,सगेसोयरे...
पानाआड दडले असतील....
गुपीतांची रंगत संगत ...
अजूनही बाकी असेल...
ते सारं पुन्हा आठवूया...
चला थोडं वेडं होऊया....
ज्यांच्या त्याच्या वाट्याचं...
आहो, आयुष्य दिलंय साऱ्यांना...
मग कशाला बरं उगाचंच...
इतरांच्यात डोकवायचं?
आपलं आयुष्य आपणच...
मनासारखं जगायचं...
लोकांच काय हो!...
ते काहीही म्हणतील!
आपण ते नजरेआड करुया...
चला थोडं वेडं होऊया...
सूर्य मावळताना...
गेल्या दिवसासाठी...
झुरुन काय उपयोग?
फुले कोमेजल्यावर...
सुगंध हुंगून काय उपयोग?
माणूस मनातून उतरल्यावर...
आठवांना कवटाळून...
काय उपयोग?
म्हणूनच...आजचा क्षण पकडून...
भरभरून जगूया...
चला थोडं वेडं होऊया...
सौ.सुधा पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा