sudhakhatav@gmail.com
वेड्या आशेवर
जे न घडे कधीही ,
ते घडावे वाटते.
स्वप्न भंगुनी जाते,
तरीही स्वप्न पाहावे वाटते.
सुमने देतात हर्ष मानस,
अन सुकुनी जातात क्षणात.
उदासी भरतो मनी मोड त्यांचा ,
तरीही न वाटे कधी खेद त्यांचा .
शोधास सुखाच्या ,
भटकतो जीवनभर
अनंत काटे बोचले पायात ,
तरीही जगतो आपण .
कारण,................................
उद्या लागेल शोध सुखाचा, याच वेड्या आशेवर
याचा वेड्या आशेवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा