🌹ओला पाऊस 🌹
दिवसभर तप्त झालेल्या धरणीला
ओला पाऊस चिंबचिंब भिजवतो
धो धो कोसळून धरतीला
कसं थंडगार बनवतो.
तो ओला पाऊस कसा
खळखळून हासतो
अगदी सैराट होऊन
मनमुराद कोसळतो.
त्यांच कोसळणं बाकी
बेधुंद असतं
जणू जगाशी त्याला
काही देणंघेणं नसतं.
त्याच ओलपण मात्र
मनाला सुखावून जातं
शीतल, थंड मनाला करुन
भावनांना भिजवून जातं.
सौ.सुधा पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा