#सर्व्हेक्षण_एकअनुभव
......चला...आपण सरकारी नोकर...एक विश्वासू कर्मचारी म्हणून शासनाने दिलेली सर्व्हेक्षण मोहिम प्रामाणिकपणे बजावली.म्हणजे अजून थोडं काम बाकी आहे...ते उद्या पूर्ण होईलच. पण थोडा त्रास सहन करीत पायवाट असणारी वस्ती...मळे ...चकचकीत डांबरी रस्त्यावर असणारी घरे ...असा एकूण सर्व्हेचा प्रवास...
बऱ्याच जणांना वाटलं...मी कशाला हा अवघड भाग घेतला...बदलून घ्यायचा...कोणातरी जेन्ट्सला द्यायला सांगायचं....पण ऑर्डर बदलण्यासाठी विनंत्या करण्यापेक्षा म्हंटल चला....अनुभव घेऊया.( 🤔कारण बरेचजण म्हणतात...बायकाही पुरुषांइतकाच पगार घेतात ना!...हे खरंच आहे ना!आणि तसंही हल्ली बायका कुठल्याच कामात मागे असतात का?...नाहीच ना!)...
असो....पण खूप काही अनुभवता आलं. विज्ञान युगात जगणारे आम्ही...लाईट, मोबाईल, टि. व्ही. अगदी मळे, वाड्या,वस्त्या इथवर पोहोचले पण ज्ञानाचा अजूनही अंधारच.....सही पुरते बरेच साक्षर आहेत. पण विचारांची कुठे उंची अफाट....तर कुठे विचारांना तळही नाही. भारत माझा म्हणे निधर्मी राष्ट्र! पण सर्व्हेक्षण ॲपमधील पोटजाती पाहून डोळेच गरगरायला लागले. आपलं जग फक्त आपल्या जाती पुरतंच मर्यादित असतं.त्यामुळे समाजात असणाऱ्या जाती...पोटजाती पाहून वाटलं...कोण इतका विद्वान होता ज्याने इतक्या पोटजाती निर्माण केल्या?...असो...माणूस कोणत्याही जातीचा असो....इथून तिथून गरजा ह्या सारख्याच! तोच जगण्यासाठीचा संघर्ष...तेच तेच प्रश्न....फक्त प्रमाण कमीजास्त इतकंच...! एकीकडे...इमले...तर दुसरीकडे झोपडी....वीट मातीचा आधार....एकीकडे झोपडीत ही आग्रहाचा गोड चहा भेटला...तर दुसरीकडे इमलेही कोरडे वाटले. कित्येक सामाजिक प्रश्न सर्वच जातीत सारखेच. गरीबांचे तेच प्रश्न...आम्हाला काही भेटणार आहे का? बेरोजगारीचा प्रश्नही....सर्वच जातीत दिसलाच. मग माणसांचा स़घर्ष नेमका कशासाठी आहे? हे माणसांना तरी कळत का? एक शिक्षक म्हणून शाळेत मानवतेचे धडे द्यायचे...आणि दुसरीकडे.....असो...पुढचं वाक्य आता बोलत नाही. पण एक समुपदेशक म्हणून अनेक महिलांची मनं वाचता आली. काही अबोल कथा समजून घेता आल्या. एक बाई म्हणून बाईशी हितगूज करता आलं. लेखिका म्हणून काही नवीन कथा बीजं सापडली. एकंदरच हा प्रवास चांगला होता. पण मनात प्रश्न तसाच...पृथ्वीवर माणूस...ही जात कधीतरी निर्माण होईल का? कुणीतरी म्हंटलय...जी कधीच जात नाही...ती जात. पण निसर्गापुढे एकच जात आहे....असेल...माणूस....
लेखक,समुपदेशक
सौ. सुधा पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा