गुरुवार, २३ जुलै, २०२०

स्वमूल्यांकन

स्वमूल्यांकन....

    माणूस एक अजब केमिस्ट्री असते.कितीही संशोधन केले तरी या केमिस्ट्री चे गुणधर्म सापडणं कठीण!
    खूपदा माणसं काहीतरी वाईट घडलं की सरळ सरळ म्हणतात, माणूसकी संपली आता.पण इतरांकडून माणूसकीची अपेक्षा करताना आपल्या आतमध्ये खरंच आपण डोकावून आपल्यातील माणूसकी आपण शोधतो का?हा खरा विचारांचा मुद्दा आहे.आपण आधी आपल्यातील माणूसकी जीवंत ठेवली की आपोआपच इतर थोडा तरी माणूसकीचा विचार करु लागतात.इतरांचे दोष उगाळीत बसण्यापेक्षा आपल्या मध्ये असणारे दोष तपासून पाहिले तर आपणच समृद्ध होत जातो.पण माणूस हा स्वच्या चुका कधी मान्यच करीत नाही.मात्र इतरांच्या चुका शोधत बसतो.खर तर जेव्हा माणसाला स्वत: मधील चूका सापडू लागतात किंवा त्या चुका तो मान्य करु लागतो तेव्हाच तो बदलू शकतो.स्वत:मध्ये सुधारणा करु शकतो.माणूसकीची अपेक्षा इतरांकडून करण्याआधी ती आधी आपल्यात असावी लागते.आधी आपण एक हात पुढे करावा लागतो.मग इतर हात आपोआप हळूहळू पुढे येत राहतात.ज्यांचा दृष्टिकोन कधीच बदलत नाही त्यांना सरळ त्याच्या विचारसरणी सोडून द्यावे.माणूस जेव्हा स्ववत:च मूल्यमापन स्वत: करू लागतो तेव्हा त्याला इतर नजरांची गरज भासत नाही.म्हणूनच बदलाची सुरुवात स्वपासून असावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...