गुरुवार, २३ जुलै, २०२०

स्टेप फादर

🌹स्टेप फादर🌹

    Hii Radha! Meet my step father! A great person in this world! दिपा आनंदाने म्हणाली.राधाचा प्रश्नार्थी चेहरा पाहून दिपा पुढे म्हणाली, what happened Radha? We accept step mother very easily. Then why not step father?
        वरील प्रसंग खरंच विचार करायला प्रवृत्त करतो.आजवर बंधनाची वारेमाप यादी आहे ती फक्त महिलांसाठी.एखाद्या पुरुषाची बायको एक्सपायर झाली की,त्याच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी दुसरी बायको लागते.त्याला मुलं असतील तर मुलांना आई लागते.मुलांना सावत्र आई तरी असावी हा समाजाचा सर्वसाधारण थोर विचार! आणि एक स्त्री सावत्र आई बनून का असेना पण मोडका संसार उभा करते.पण एक विधवा स्त्री असेल,तिला मुलं असतील तर तिच्या मुलांना आधार देणारं खरंच कुणी असतं का?असतीलही मोजकी उदाहरणे पण ती अगदी नगण्य!
    सावत्र आई या समाजाला मान्य आहे.पण एखादा पुरुष सावत्र बाप बनायला कधीच तयार नसतो.दुसरी बायको तर हवी असते.पण तीला मुलं नको असतात.पण एक स्त्री मात्र असा विचार करीत नाही.तीनं एखाद्याचा संसार उभा करावा ही समाजाची मानसिकता बरं का! पण एखाद्या स्त्रीला मुलं असतील तर तीला आणि तिच्या मुलांसहित स्वीकारायला एखादा पुरुष तयार नसतोच.इथेच केवळ व्यावसायिक विचार! आपल्या समाजात सावत्र आई ही संकल्पना चांगलीच रुजली आहे.पण सावत्र बाप हे काहीतरी भलतंच वाटतं लोकांना.म्हणजे काय अन्याय सहन करण्याची मक्तेदारी जणू महिलांचीच अशीच समाजाची मानसिकता आहे.याला अपवाद असू शकतो.पण जीवनाच्या प्रत्येक विचारात बाई ही मागेच असते.कारण बायकांनी हे करणं चुकीचं,ते करणं चुकीचं हे जणू लिखितच आहे.विधूर पुरुषांचा समाज विचार करतो.त्याच्या मुलांचा विचार करतो.पण विधवा महिला किंवा त्यांची मुलं याचा विचार समाज करतो का? सावत्र आई समाजाला मान्य आहे मग सावत्र बाप का मान्य नसावा?खरा प्रश्न तर हा आहे की, सावत्र आई व्हायला माझी भगिनी तयार असते.पण सावत्र बाप व्हायला कोणी तयार नसतो.ही आपली सामाजिक रचना आणि मानसिकता आहे.ती कोणी तयार केली?ज्यांनी महिलांसाठी रुढी परंपरा तयार करून ठेवल्या त्याच महान लोकांनी हेही नियम पुरुषी मनावर बिंबवले असतील ना!
     पण आता काळ बदलला आहे.आपली मानसिकता देखील बदलायला हवी.समस्या,गरजा ह्या एक स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्या असतात.म्हणूनच एक स्त्री पुरुषाचा संसार पुन्हा उभा करते तर मग सावत्र बाप बनून एखाद्या पुरुषाने एखाद्या निराधार स्त्रीचा संसार पुन्हा का उभा करू नये?जीव लावता आला की कोणाचीही आई आणि किंवा बाप होता येतं.गरज असते ती विचारांची आणि प्रेमळ हृदयाची!
सौ.सुधा पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...