बुधवार, २२ जुलै, २०२०

एकदा पावसात भिजून बघ

एकदा पावसात भिजून बघ
मस्त त्याला लपेटून बघ

पाऊस कोसळतो धरावर
आठवणी तरंगतात मनावर
तो मोरपीस क्षण पुन्हा आठवून
रोमांच उभारतो तनावर
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ...

दूरवर त्या डोंगरावर पाऊस कोसळतो
क्षितिजावर आनंदाने उधळतो
अन् धरतीला प्रेमामृत पाजतो
मग धुंदीत प्रेमाच्या धरती
हिरवा शालू नेसते
अन् आकाशाशी जणू एकरुप होते
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ...

पाऊस असतोच आबालवृद्धांना सुखावणारा
प्रेमवीरांना चिंबचिंब भिजविणारा
पक्षांना, पंखावर पाऊस घेऊन
आनंदाने घिरट्या घालायला लावणारा
मोराला धुंदीत नाचायला सांगणारा
अन् मानवी मनाला भिजवून शांत करणारा
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ..

तो कोसळतो धुंद होऊन
अन् जातो सृष्टीला चैतन्य देऊन
तुझं माझं साऱ्यांच गुपीत ओलंचिंब करून
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ
मस्त त्याला लपेटून बघ....

         सौ.सुधा पाटील




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...