बुधवार, २२ जुलै, २०२०

टिळक आजी...

🌹उत्साहाची अखंड सरिता 🌹

     उत्साह! म्हणजे जणू सळसळता वारा, रिमझिम पाऊस धारा... उत्साह म्हणजे जणू जीवनातील जिवंतपणाच!मानवी जीवन अखंड तेवत ठेवतो ते त्याच्यातील उत्साह! उत्साह मानसाला सदैव टवटवीत ठेवतो.उत्साही माणसंच चिर तरुण राहतात.क्षणा क्षणात जीवन जगतात आणि जीवनाला सजीव ठेवतात.अशा लोकांकडे पाहिलं कि, इतरांनाही जीवन जगताना संजीवनी लाभते.
    अशाच उत्साहाची अखंड सरिता आहेत टिळक आजी!वय वर्ष ऐंशी.पण उत्साह जणू तरुणींना लाजवेल असा.आजही त्या सदैव गोड,हसऱ्या चेहऱ्याने सर्वांचं स्वागत करतात.नातीला, सुनेला, लेकाला आणि नवऱ्याला न थकता अनेक पदार्थ उत्साहाने करून घालतात.आजीनी पाककृती, विविध आईस्क्रीमचे नमुने,घरच्या घरी स्टार्च करणे असे क्लासेस खूप वर्षं घेतले.आज एवढ वय असूनही सुमन आजी नित्य घरात व्यस्त असतात.घरातील प्रत्येक वस्तू निटनेटकी ठेवतात.घरच्या सोफ्यासाठी स्वत: पसंतीने कापड खरेदी करून कव्हर आजही त्या स्वत: शिवतात.
    आजचं ओजश्रीचा वाढदिवस होता.ओजश्री म्हणजे माझी मानस कन्या आणि आजीची नातं! आजीने सकाळपासून तयारी करून सुनेच्या मदतीने सर्वांसाठी रगडा पॅटीस आणि मॅंगो फ्रुट सॅलड बनवलं होतं.साऱ्यांनी आजीच भरभरून कौतुक केलं.मी तर आजीच्या या उत्साहाने उत्साहमयचं झाले.याही वयात आजी प्रत्येक गोष्ट न थकता आनंदाने करते.ती स्वत: सदैव अपडेट असते.गौर वर्ण, सडसडीत बांधा, सदैव हसरा चेहरा आणि क्षणाक्षणात ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे सुमन आजी सर्वांच्या मनात जीवंतपणा निर्माण करते.आळसावलेल्या, निरुत्साही तरुण पिढीसाठी आजी एक सकारात्मक एनर्जी देणारी उत्साहाची सरिताच आहे.तिच्या सानिध्यात जीवन एक सुंदर गाणं वाटतं.आजही ती आधुनिक काळात समरस होऊन जगते.ती कुठेही पिढीतील अंतरात अडकत आहे.नवीन गोष्टींचा आनंद घेते.नाविण्याचा पुढाकार करून आजमध्ये जगणारी आजी खरंच तरुण पिढीला एक आदर्श आहे.
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502,)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...