🌹एकांत आणि एकाकीपणा.....🌹
खरं तर एकांत आणि एकाकीपणा या दोन भिन्न मानसिक संकल्पना आहेत.खूफदा मानसिक शांतीसाठी एकांत हवा असतो.काही काळ एकांतात बसले कि आपलीच आपल्याशी भेट होते.आपणच आपणास ओळखू लागतो.म्हणूनच स्वचा विकास करण्यासाठी कधी कधी एकांत खूपच गरजेचा असतो.पण एकाकी आयुष्य जगताना खुपदा नैराश्य येऊ शकते.पण काही काही माणसं एकाकी असली तरी ती त्यास एकांत बनवून छान आयुष्य जगतात.एकाकीपणास एकांत ज्याला बनवता येतो तो त्याचा सदुपयोग करतो.पण जे एकाकीपणात अडकून सतत नैराश्यात अडकतात ते दबावाखाली आयुष्य जगतात.
खूपदा माणसाच्या गर्दीतही माणूस एकाकी असतो.आणि एकटा असला तरी तो एकांत आनंदाने अनुभवतो.एकांतात माणूस शांती अनुभवू शकतो.आनंदमय अशा आठवणीत आजूबाजूला गर्दी अनुभवतो.म्हणूनच म्हणतात,एकटा माणूस कधी कधी आजूबाजूला गर्दी अनुभवतो.तर गर्दीतही कधी कधी माणूस एकटा असतो.खरं तर या मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे..... क्रमशः...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा