शुक्रवार, २४ जुलै, २०२०

कविता माझी..

आम्ही लेखिका ग्रुप..काव्यपुर्ती उपक्रम
नसिफा सय्यद यांच्या ओळींवरून मी काव्यपूर्ती करित आहे..

    🌹हसरी बाई 🌹

प्रत्येक हसऱ्या बाईत
एक दुखरी वेदना दिसते
गुलाबी ओठांच्या पलीकडे
काळी निळी वेदना हसते.

कुटुंबासाठी ती सतत
धावधाव धावत राहते
तरीही तिच्या कष्टाचे
महत्त्व कोणालाच नसते.

तिचं विश्र्व जणू केवळ
तिचं कुटुंबच असते
तिला तिच्यासाठी जगणं
कधी ठाऊकच नसते.

मनात लपवून अनंत यातना
ती घाण्याला फिरतचं राहते
स्वत:चा आर्त आवाज गाढून
ती मुखवटा लेवून हसते.

खरंच प्रत्येक हसरी बाई
अश्रू पिऊनच जगते
बाईपणाच्या बेडीत अडकून
शेवटी सरणावर चढते.
        *सुधा पाटील*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...